मसुरे प्रतिनिधी:
मालवण तालुक्यातील महान येथील दत्ताराम पांडुरंग घाडी यांच्या घराशेजारी आढळून आलेल्या खापरखवल्या या प्रजातीच्या सर्पाला कांदळगाव सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. खापरखवल्या याचे इंग्रजी नाव -Shieldtail असे आहे.शेपटीवर खाप मारल्याप्रमाणे रचना असल्याने या सापाला असे नाव दिले आहे.
सदर साप बिनविषारी प्रजाती मधील दुर्मिळ असल्याची माहिती परुळेकर यांनी दिली.