Home स्टोरी महान ग्रामपंचायत ग्रामसेवक सागर देसाई यांच्या पत्रानंतर शशांक माने यांचे उपोषण स्थगित!

महान ग्रामपंचायत ग्रामसेवक सागर देसाई यांच्या पत्रानंतर शशांक माने यांचे उपोषण स्थगित!

273

मालवण: बुधवार दि. २८ जून रोजी रोजी सकाळी १० वाजता युवासेना विभागप्रमुख शशांक माने यांनी उपोषण सुरू केले यावेळी गावतील ग्रामस्थ, युवासेना, शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते या वेळी सरपंच ग्रामपंचायत महान यांनी बघ्याची भुमिका घेतली यानंतर ग्रामसेवक ग्रामपंचायत महान हे शिष्टाईस आले असता उपोषण कर्ते शशांक माने यांनी जो पर्यंत वरिष्ठ कार्यालय आदेश देत नाही तो पर्यंत उपोषण सुरू राहिल हि भुमिका घेतली. ग्रामसेवक सागर देसाई यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती मालवण यांच्याशी चर्चा केली असता ग्रामसेवक ग्रामपंचायत महान यांनी ३० जून रोजी अंतिम निर्णय पंचायत समिती मालवण गट विकास अधिकारी ग्रामपंचायत महान यांस देणार आहेत. असे पत्र ग्रामसेवक ग्रामपंचायत महान यांनी युवासेना विभागप्रमुख शशांक माने यांना दिल्यामुळे संध्याकाळी ६ वाजता उपोषण स्थगित केले.

यावेळी महान माजी सरपंच विघामान ग्रा.प.सदस्य सीताबाई महानकर यांनी वेळोवेळी मासिक सभेत विरोध केला असुन शासनाच्या नियमानुसार ना-हरकत दाखला घावा सांगितले.तसेच ना-हरकत दाखल्यास अडवता येणार नाही असे सांगितले.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख छोटु ठाकुर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमितजी भोगले युवासेना विभागप्रमुख राहुल सावंत, युवासेना उपविभागप्रमुख ग्रा.प.सदस्य कुंभारमाठ राहुल परब, मसुरे सरपंच समीर हडकर, शिवसेना विभागप्रमुख तथा मसुरे उपसरपंच राजेश गावकर, शिवसेना विभागप्रमुख भाऊ चव्हाण, महान माजी सरपंच विद्यमान ग्रा.प.सदस्य सीताबाई महानकर, महान माजी उपसरपंच संजय हळवे, शाखाप्रमुख दिपक परब, ग्रामस्थ हरी साळुंखे, गजानन साळुंखे, रमाकांत साळुंखे, रमेश साळुंखे, बाळा घाडी, प्रल्हाद घाडी, नामदेव साळुंखे, गोविंद साळुंखे, संजना बिरमोळे, दिप्ती हळवे,राधिका हळवे, स्मिता ईळकर उपस्थित होते.