म्हसळा प्रतिनिधी:(संजय खांबेटे): १९७१ ची S. S.C.मधील महाड वि.ह. परांजपे हायस्कूलचे तब्बल ५० वर्षापूर्वीचे मित्र २९-३० एप्रिल २०२३ रोजी महाड मध्ये हायस्कूल समोर एकत्र भेटले ,त्यानी ऐकमेकाना भेटत मिठया मारत प्रचंड आनंदी माहोल केले. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांनाही कुतुहल वाटेल असेच असेच वातावरण होते .जमलेल्या मित्रानी सांस्कृतिक प्रथेनुसार प्रथम ग्रामदैवत असलेल्या विरेश्वर मंदीरांत जाऊन दर्शन घेतले. मंदीराचे विश्वस्त दिपक वारंगे,रमेश नाटेकर, संजय पवार व अन्य ट्रस्टीनी सर्वांचेच स्वागत करून कौतुक केले. महाड व्यतीरीक्त अन्य भागांतून येणारी आणि स्थानिक वर्ग मित्र सायंकाळी ५ वाजता नाते येथील सुधाकर मांडवकर यांचे हॉटेल अंगण मधील प्रांगणात बघता-बघता २०-२२ जण आपापल्या वर्गमित्राला घेऊन हजर झाले, त्याध्ये स्थानिक, पनवेल, पुणे, म्हसळा, तळा भागात वास्तव्यास असलेले विद्यार्थी होते. पुणे येथे रहाणारा सुधीर गद्रे याच्या मनांत आले त्यानी दिपक कोटीया, संजय खांबेटे, महाड मधील नंदू शेठ, अविनाश टक्के, विनायक खोडके यांचे जवळ संकल्पना मांडली आणि SSC Pass in1971 ह्या नावे व्हाटसअॅप गृप बनला आणि ५० वर्षापूर्वीचे चांदे क्रिडांगणात खेळणारे विद्यार्थी आता आजोबाच्या भूमिकेत एकत्रित मिठया मारत जमले आणि Get Together चा कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी शरद जोशी, नंदू मेहता, नितीन दोशी ,शेखर वाडकर, सुशील कडू निरंजन गुप्ते, कुमार मेहता ,संतोष वारंगे माधव मुंदडा दिलीप देव दिपक देसाई, प्रशांत शेट, मारुती कदम, राजन आर्ते, सुधीर जाधव व अन्य मित्रांचे संर्पक मिळविले कार्यक्रमाचे स्वरुप होते छोटे, परंतु भावना होत्या लाघवी. प्रथमतः निधन पावलेल्या शिक्षक आणि विद्यार्थी मित्राना सर्वानी दुखवटा व्यक्त केला आणि नंतर परिचयआसा होता. ग्रुपमध्ये नोंद झालेले एकूण मित्र ३० होते त्यापैकी १५ व्यापारी,११ अशासकीय सेवेत, ४ शासकीय सेवेत असे होते. बहुतांश मित्रांची मुले सुध्दा लंडन, मिशिगन, बेल्जियम, जर्मनी, दुबई, कुवेत, आफ्रिका आशा देशांतून नोकरी साठी आहेत.५ दशकानंतर आमचे चेहरे एकमेकांसाठी अनोळखी झाले होते. पण मैत्रीची ओळख पक्की होती. वर्गातल्या गोष्टी काढत्यावर आठवणी डोळ्यासमोर तरळल्या. गुरुजनांच्या आठवणीने काहींच्या डोळ्यांच्या पापण्या नकळत ओलावल्या.आम्हाला एकत्र आणणाऱ्या सर्व मित्रांना धन्यवाद. सरतेशेवटी सहा महिन्यानी एकत्र भेटायचे हा ठराव करुन नव्या उत्साहाने आम्ही सारे घरी परतलो यावेळी माधव मुंदडा यानी पुढील वेळी कॉलेजचा कॉमर्सचा गृप करावा अशी विनंती केली.”
या सर्वामध्ये एक भावनात्मक प्रसंग होता तोआमच्यातील वारावर शिक्षण घेणारा दिलीप देव यांनी गरीबीत शिकून सामाजिक भावनेंतून ६५ वेळा केलेले रक्तदान, लातूरला भूकंप काळांत जाऊन मदत कार्यात घेतलेला सक्रीय सहभाग , स्वताला झालेला कॅन्सर सारख्या व्याधीवर मात करून पनवेलला दहा वर्ष पटवर्धन हॉस्पिटल येथे विना मोबदला रुग्णसेवेचे केलेले कार्य त्याबद्दल मानपत्र देऊन मित्रांनी केलेला सत्कार सर्वांच्याच स्मरणात रहाणार आहे.