मसुरे प्रतिनिधी:
कुलदेवता उत्कर्ष मंडळ मसुरे विकास वाडी आयोजित घरगुती गणेश सजावट स्पर्धेमध्ये मसुरे येथील राम बागवे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला द्वितीय क्रमांक आर्यन बागवे यांनी आणि उत्तेजनार्थ श्री उल्हास बागवे आणि श्री उदय सावंत यांनी प्राप्त केला. या स्पर्धेमध्ये एकूण ३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तरुण मुलांना गड किल्ले याबद्दल आवड आणि मार्गदर्शन होण्यासाठी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या सजावट विषय सर्व स्पर्धकांना देण्यात आला होता. विजयी सर्व स्पर्धकांना रोख रुपये आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेसाठी परीक्षण सौ. संजना बागवे, संगीता बागवे आणि कोदे मॅडम यांनी केले. बक्षिस वितरण प्रसंगी राजन बागवे, जयवंत बागवे, आप्पा बागवे, विजय राणे, श्री शेटये, सुनील बागवे,नंदेश बागवे,चेतना बागवे,सिद्ध बागवे आणि मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.