मसुरे प्रतिनिधी: मसूरे येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथील मसूरे केंद्र शाळा, आर. पी. बागवे हायस्कुल आणि भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुलच्या सर्व विध्यार्थ्यानी प्रभातफेरी द्वारे मसुरे बाजारपेठ येथे एकत्र येत शिवगर्जना दिल्या. यावेळी प्रशालेच्या विध्यार्थ्यानी शिवकालीन विविध वेशभूषा साकारल्या
तसेच शिवजन्म प्रसंग, लेझीम नृत्य, पोवाडा, मर्दानी खेळ, नाटिका आदी सादर केल्या. यावेळी सर्व शाळांचे शिक्षक, ग्रामस्थ, विध्यार्थी, शिवप्रेमी उपस्थित होते. आभार विनोद सातार्डेकर यांनी मानले.