Home स्टोरी मसुरे साई मंदिर येथे १९ एप्रिल रोजी खुली एकेरी नृत्य स्पर्धा! विजेत्या...

मसुरे साई मंदिर येथे १९ एप्रिल रोजी खुली एकेरी नृत्य स्पर्धा! विजेत्या १ ते ८ क्रमांकांना रोख रुपयांची बक्षिसे.

105

मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील मसुरे रविवार बाजारपेठ येथील श्री साई मंदिर च्या वर्धापन दिनानिमित्त मसुरे साई मंदिर येथे दिनांक १९ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता भव्य खुली रेकॉर्ड डान्स (एकेरी नृत्य ) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी बक्षीसे अनुक्रमे १ ते ४ क्रमांक रोख रुपये ३०००/- १५००/- ,५००/- ,५००/- . तसेच चार ते आठ क्रमांकांना प्रत्येकी ३००/- रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी आपले नावे दत्तप्रसाद पेडणेकर मो.९४२११४५८२७ किवा रोशन दुखंडे मो. ९४०५५३०२४७ यांच्या पाशी नोंदवावीत असे आवाहन साईकृपा मित्र मंडळ मसुरे गडघेरा बाजारपेठ यांनी केले आहे.स्पर्धा नीशुल्क आहे. ही स्पर्धा श्री साई मंदिर मसुरे रविवार बाजारपेठ येथे होणार आहे.