मसुरे प्रतिनिधी: मसुरे गावचे ग्रामदैवत श्री देव जैन भरतेश्वर मंदिराचा प्रथम कलशारोहण वर्धापन दिन सोहळा १३ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न होणार आहे. यावेळी सकाळी ७.३० वाजता होम हवन विधी सह धार्मिक कार्यक्रमास सुरुवात, दुपारी १२.४५ पालखी सोहळा, दुपारी १ वाजता महाआरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ नंतर स्थानिक सुस्वर भजने, सायंकाळी ७.३० वाजता पालखी सोहळा, रात्री आठ वाजता महाआरती, रात्री १० वाजता श्री देव भरतेश्वर मंदिर नाट्य मंडळ मुंबई यांचे ‘माझ्या मना’ हे सामाजिक नाटक होणार आहे.