मसुरे प्रतिनिधी: मसुरे मर्डे वाडी येथील जागृत देवस्थान श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ आणि भूमिपूजन मसुरे देवस्थान प्रमुख मधुकर प्रभूगावकर यांच्या शुभ हस्ते आणि या ट्रस्टचे अध्यक्ष तथा समाजसेवक श्री प्रकाश परब यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच करण्यात आला. मसुरे येथील विठ्ठल रखुमाई या मंदिराचा जिर्णोद्धार येथील ट्रस्ट आणि ग्रामस्थ यांनी हाती घेतला असून लवकरच या ठिकाणी वास्तु कलेचा एक उत्कृष्ट नमुना आपल्याला पाहायला मिळणार असून अतिशय सुंदर असे मंदिर या ठिकाणी उभे राहणार आहे. यासाठी भाविकांनी सरळ हस्ते मदत करण्याचे आवाहन विठ्ठल रखुमाई मंदिर जीर्णोद्धार समितीच्या आणि मर्डे ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी मधुकर प्रभू गावकर, श्री प्रकाश परब, विद्याधर पारकर, जगदीश चव्हाण ,संतोष सावंत, राजन परब, सन्मेष मसुरेकर, राजू सावंत, वसंत प्रभू गावकर, पंढरीनाथ नाचणकर, अरुण भट, नागेश सावंत, सचिन पाटकर,दिलीप परब शिवाजी परब, विलास मेस्त्री, विलास सावंत, दिनेश नाचानकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते .