Home स्टोरी मसुरे येथे आज समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव

मसुरे येथे आज समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव

116

मसुरे प्रतिनिधी: मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथे आज ५ जून रोजी श्री समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ८ ते १० वा. दत्त गुरुंची पूजा अर्चा, सकाळी ११वा. समर्थांच्या समाधीचे पूजन व अभिषेक, दुपारी १२ वा. महाआरती, १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ ते ९ : वा. स्थानिकांची सुश्राव्य भजने, रात्रौ ९:३० वा. वालावलकर दशावतार नाट्य कंपनीचा नाट्य प्रयोग  होणार आहे. उपस्थीतीचे आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.