Home स्टोरी मसुरे भरतेश्वर मंदिर येथे रामनवमी उत्सवात सुरुवात …

मसुरे भरतेश्वर मंदिर येथे रामनवमी उत्सवात सुरुवात …

94

मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत ३६० खेड्यांचा अधिपती राजा श्री देव जैन भरतेश्वर मंदिर येथे बुधवार दिनांक २२ मार्च ते शुक्रवार दिनांक ३१ मार्च २०२३ या कालावधीत गुढीपाडवा ते रामनवमी नवरात्र उत्सव शाही पालखी सोहळ्यास सुरुवात होत असून रोजचे कार्यक्रम रात्रौ ९ वाजता ग्रामोपध्याय सुरेश जोशी यांचे पुराण वाचन, ९:२० वाजता शाही पालखी सोहळा, ९:५० वाजता नामस्मरण जप, १० वाजता कीर्तन, ११:३० वाजता श्रींची महाआरती. याप्रमाणे होणार असून रोजचे ह. भ. प. कीर्तनकारांची सूची खालील प्रमाणे २२ मार्च ह. भ. प. श्री. विनोद सखाराम सातार्डेकर, २३मार्च ह. भ. प. कु. अक्षय अरुण परुळेकर, २४ मार्च ह. भ. प. कु. अक्षय सखाराम सातार्डेकर, २५मार्च ह.भ.प. श्री वासुदेव कृष्णा सडवेलकर,२६मार्च ह. भ. प. श्री. किरण प्रकाश पारकर,२७मार्च ह. भ. प. श्री. किरण प्रकाश पारकर,२८मार्च ह. भ. प. श्री. किरण प्रकाश पारकर, २९ मार्च ह. भ. प. श्री. मनोज खोचरे,श्रीरामनवमी दिवशी : ३०मार्च ह. भ. प. श्री. शेखर पाडगांवकरलळीत : ३१मार्चह. भ. प. श्री. हृदयनाथ गावडे आहेत.विशेष सूचना :- गुरुवार दिनांक ३० मार्च रोजी रामजन्म उत्सव कार्यक्रम सकाळी ९:३० वाजाता पुराण वाचान, १० वाजता कीर्तन, १२ वाजता श्री प्रभूराम जन्मोत्सव, १२:४५ वाजता महाआरती, १:१० शाही श्रींचा पालखी सोहळा, १:३० वाजता महाप्रसाद, शुक्रवार दिनांक ३१ मार्च रोजी लळीत कार्यक्रम होणार आहे. रात्रौ ९:३० वाजता पुराण वाचन, १० वाजता शाही पालखी सोहळा तदनंतर १०:२० वाजता शक्तीपीठ श्री माऊली मंदिर येथे श्रींच्या शाही पालखीचे प्रस्थान व माऊली मंदिर येथे शिव शक्ती भेट , १०: ४५ वाजता कीर्तन, ११ : २५ वाजता माऊली मंदिर येथून श्रींच्या शाही पालखीचे भरतेश्र्वर मंदिरकडे प्रस्थान, १२ वाजता दशावतार नाटक . असा सोहळा संपन्न होणार असून या या सोहळ्यात सर्व भाविकांनी उपस्थीत राहून श्रींचे शुभाशीर्वाद घ्यावेत. असे आवाहन श्री देव जैन भरतेश्वर मंदिर ट्रस्ट व सर्व मानकरी गाव रहाटी कसबा यांनी केले आहे..