मसुरे प्रतिनिधी:
दिवाळीपूर्व नरकासुर दहन ही एक मोठी परंपरा आहे. मसुरे परिसरात नरकासुराच्या महाकाय प्रतिकृती आणि जल्लोषात भव्य मिरवणूक काढून पहाटे नरकासुराचे दहन केले गेले. श्रीकृष्णाने नरकचतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध केला होता अशी आख्यायिका आहे. कागदाचे लगदे, पालापाचोळा आणि विविध साहित्य नरकासुर बनविण्यासाठी वापरले जाते. युवा पिढी दसऱ्यानंतर अगदी पछाडल्यागत नरकासुर तयार करण्यासाठी झटत असतात. मुख्यत: रात्रीच्या वेळी नरकासुर बनविण्याची प्रक्रिया सुरू असते. चालू वर्षी दिवाळी पूर्वी पाऊस पडल्याने काही प्रमाणात तयारी वर विरजण पडले होते. शनिवारी रात्री मसुरे बाजारपेठ, मर्डे वाडी, गडघेरावाडी, देऊळवाडा, बांदिवडे आदी भागात युवकांनी नरकासुर धिंड काढत पहाटे दहन केले.यावेळी शिरीष प्रभुगावकर, बाळू दळवी,दत्तप्रसाद चव्हाण, दीपक पेडणेकर,अवधूत चव्हाण, रुपेश दुखंडे, रामा मसूरकर, संदेश सागवेकर, सुनील दुखंडे, चेतन दुखंडे, रोशन दुखंडे समर्थ दुखंडे, आयुष दुखंडे, लावण्या दुखंडे, विक्रांत प्रभुगावकर, रणवीर प्रभुगावकर,प्रथमेश घाडी, अनिकेत चव्हाण, बंडू शिंदे, मिहीर मसुरकर, अरुंधती चव्हाण, गोरक्ष चव्हाण, निधी पेडणेकर, झुंजार पेडणेकर आदी उपस्थित होते.