Home स्टोरी मसुरे देऊळवाडा शाळेत आरोग्य विषयक मार्गदर्शन व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न!

मसुरे देऊळवाडा शाळेत आरोग्य विषयक मार्गदर्शन व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न!

180

मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर):  प्राथमिक आरोग्य केंद्र, मसुरे व शाळा व्यवस्थापन समिती देऊळवाडाच्या सहकार्याने प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा शाळेत आरोग्य विषयक मार्गदर्शन व विद्यार्थी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न झाले. यावेळी डाॅ. वीणा मेहेंदळे, आरोग्यसेवक श्री. सावजी, सौ. रसाळ मॅडम, आशा स्वयंसेवक सौ. अंकिता मेस्त्री, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. कदम यांनी आरोग्य केंद्राच्या वतीने सहकार्य केले.

यावेळी ‘पावसाळ्यात घ्यावयाची आरोग्याची काळजी’ या विषयावर डॉ. मेहेंदळे मॅडम यांनी मार्गदर्शन केले तर आरोग्यसेवक श्री. सावजी यांनी पावसाळ्यात पसरणारे साथीचे रोग याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सर्व मुलांचा रक्तगट आणि हिमोग्लोबिन तपासण्यात आले. त्याबाबत मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सदानंद कबरे, उपाध्यक्ष सौ. लाकम,  मुख्याध्यापक श्री. प्रशांत पारकर व शिक्षक वर्ग यांनी नियोजन केले.