Home स्टोरी मसुरे देऊळवाडा येथे १० रोजी गुरुद्वादशी निमित्त विविध कार्यक्रम!

मसुरे देऊळवाडा येथे १० रोजी गुरुद्वादशी निमित्त विविध कार्यक्रम!

151

मसुरे प्रतिनिधी:

 

श्री समर्थ बागवे महाराज संस्थान मसुरे देऊळवाडा येथील दत्तमंदिरात १० नोव्हेंबर रोजी गुरुद्वादशी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते ११ वा. दत्तात्रेयांच्या मूर्तीची विधियुक्त पूजा अर्चा व अभिषेक, दुपारी १२ वा. श्रींची महाआरती, १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळीं ७ ते ९ वा. स्थानिकांची सुश्राव्य भजने, रात्रौ ठीक ९:३० वा. दत्तमाऊली दशावतार नाटय मंडळ, सिंधुदुर्ग यांचा “सहस्त्रनागबळी” हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ भाविक रसिकांनी घ्यावा असे आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.