Home स्पोर्ट मसुरे डांगमोडे येथे २९ मार्च रोजी भव्य जिल्हास्तरीय पुरुष आणि निमंत्रित महिला...

मसुरे डांगमोडे येथे २९ मार्च रोजी भव्य जिल्हास्तरीय पुरुष आणि निमंत्रित महिला कबड्डी स्पर्धा.

130

विजेत्यांना मिळणार कै. शिवाजी गंगाराम ठाकूर भव्य स्मृती चषक.

 

मसुरे प्रतिनिधी: सिधुदूर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि मालवण तालुका असोसिएशन यांचा सहकार्याने आणि नवतरुण मित्र मंडळ मसुरे डांगमोडे यांच्या वतीने मसुरे-डांगमोडे रवळनाथ मंदिर येथील श्रीदेवी भवानी वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त दिनांक 29 मार्च रोजी जिल्हास्तरीय पुरुष व महिला निमंत्रित संघाच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन डांगमोडे रवळनाथ मंदिर नजीक करण्यात आलेले आहे.

या स्पर्धेचे प्रथम परितोषिक रोख रू 5000,

द्वितीय पारितोषिक रोख रू. 3000,

तृतीय पारितोषिक रोख रू.1500आणि

चतुर्थ परितोषिक रोख रू1500

व कैलास वासी शिवाजी गंगाराम ठाकूर स्मृती चषक देण्यान येईल.

तसेच स्पर्धेमधील उत्कृष्ट चढाई, क्षेत्ररक्षक व उत्कृष्ट खेळाडू यांना रोख रुपये आणि आकर्षक चषक देण्यात येईल. स्पर्धा रात्री ठीक सात वाजता सुरू होणार असून स्पर्धेत सहभागी सर्व संघांच्या खेळाडूंची भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व संघानी आपली नावे नितीन हडकर मो. ७२४९३५७२३९ किवा दत्तप्रसाद पेडणेकर मसुरे मो. ९३७३८५५६४३ येथे संपर्क साधावा असे आवाहन नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे आणि डांगमोडे ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आलेले आहे..