Home स्पोर्ट मसुरे डांगमोडे येथे १७ मार्च रोजी भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा… जिल्ह्यातील नामवंत...

मसुरे डांगमोडे येथे १७ मार्च रोजी भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा… जिल्ह्यातील नामवंत महिला संघा ंच्या शो मॅच खास आकर्षण….

119

मसुरे प्रतिनिधी: मसुरे डांगमोडे येथील जागृत देवस्थान श्री देव रवळनाथ मंदिर येथे श्रीदेवी भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवाचे अवचित्य साडू साधून शुक्रवार दिनांक १७ मार्च रोजी डांगमोडे येथे जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने आणि नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे आणि ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेची बक्षिसे अनुक्रमे १ ते २ क्रमांक रोख रुपये ७०००/_ रोख रुपये ४०००/- तसेच ३ आणि ४ क्रमांक रोख रुपये १५०० प्रत्यकी. सर्व विजयी संघांना कैलासवासी शिवाजी गंगाराम ठाकूर यांच्या स्मरणार्थ भव्य चषक देण्यात येणार आहेत. तसेच या स्पर्धेतील उत्कृष्ट रायडर, उत्कृष्ट डिफेंडर आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना रोख रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच खास आकर्षण म्हणून जिल्ह्यातील काही नामवंत महिला कबड्डी संघाचे शो मॅच म्हणून सामने ही यावेळी संपन्न होणार आहेत. सर्व खेळाडूंची जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली असून स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही आहे. स्पर्धा १७ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता सुरू होईल. सर्व इच्छुक संघाने आपली नावे नितीन हडकर (मालवण ) मो.7249357239.दत्तप्रसाद पेडणेकर मसुरे मो 9421145827 यांच्याकडे देण्यात यावी असे आवाहन नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्या वतीने करण्यात आलेले आहे..