Home शिक्षण मसुरे केंद्र शाळेमधील शिक्षक प्रश्नासंदर्भात योग्य ते सहकार्य करण्याचे शिक्षणाधिकारी गणपती कमळकर...

मसुरे केंद्र शाळेमधील शिक्षक प्रश्नासंदर्भात योग्य ते सहकार्य करण्याचे शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांचे आश्वासन.

90

मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील मसुरे केंद्र शाळा या प्रशालेतील केडर प्रमाणे मंजूर असलेल्या चार शिक्षकांपैकी तीन शिक्षकांची अचानक बदली प्रशासनाने करून पुन्हा त्याच प्रशालेत दोन शिक्षक कामगिरी वरती आणण्याचा पराक्रम काही दिवसापूर्वी केला होता. याबाबत येथील ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती आणि मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी बुधवारी दुपारी ग्रामस्थांसहित थेट ओरोस येथे शिक्षणाधिकारी गणपती कमळकर आणि प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले. यावेळी शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांनी या प्रश्नासंदर्भात मसुरे केंद्र शाळेस योग्य ते सहकार्य करून केडर प्रमाणे चार शिक्षक या ठिकाणी लवकरच देण्याचे आश्वासन देऊन या संदर्भात मालवणचे गटशिक्षणाधिकारी श्री माने यांना दूरध्वनी करून कायमस्वरूपी शिक्षक देण्याचे लेखी पत्र देण्याच्या सूचना केल्या आहेत.

प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस आणि शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांच्या आश्वासनावरती येथील शाळा व्यवस्थापन समिती समिती, पालक, ग्रामस्थ आणि माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केले आहे. मसुरे केंद्र शाळा येथे केडर प्रमाणे चार शिक्षक मंजूर असतानाही या ठिकाणच्या तीन शिक्षकांच्या काही दिवसापूर्वी बदली करून त्यांच्या मूळ शाळेवरती हजर केले आणि लगेचच पुन्हा कामगिरी वरती त्या दोन शिक्षकांना पुन्हा मसुरे केंद्र शाळा कामगिरी वरती दिली. आता ऐन परीक्षेच्या हंगामातच शिक्षण विभागाने केलेल्या या अन्यायकारक बदल्यांबाबत येथील ग्रामस्थांनी थेट ओरोस येथे जाऊन शिक्षणाधिकारी आणि प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन जाब विचारला. येथील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी अखेर शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांनी मालवणचे गटशिक्षणाधिकारी श्री माने यांना त्वरित दुरध्वनी करून मसुरे केंद्र शाळेतील शिक्षकांसंदर्भात कायमस्वरूपी शिक्षक देण्याचे लेखी पत्र देण्याचे सूचना केल्यात. गटशिक्षणाधिकारी श्री माने हे मसुरे येथे येऊन प्रशालेमध्ये संबंधित शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक आणि लोकप्रतिनिधी यांच्यासमोरच सदर लेखी पत्र शाळा व्यवस्थापन समितीला देतील या आश्वासनावरती शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शितल मसुरकर आणि मसुरे माजी सरपंच सौ लक्षमी पेडणेकर यांनी तुर्त आंदोलन स्थगित केले आहे. जर याबाबत शिक्षण विभागाने पुन्हा चालढकलपणा केल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येऊन या प्रशालेतील सर्व मुले ओरोस येथे शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेर बसविण्यात येतील आणि याबाबत लेखी निवेदनाद्वारे माननीय आमदार श्री निलेश राणे, पालकमंत्री नामदार नितेश राणे, खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधले जाईल अशी माहिती माजी सरपंच लक्ष्मण पेडणेकर आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ शितल मसुरकर यांनी दिली.

 

शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांच्या आश्वासना नुसार येथे कामगिरी वर असलेले जे दोन शिक्षक आहेत त्या शिक्षकांसंदर्भात जर त्यांच्या मूळ शाळेवरती ग्रामस्थांनी उठाव केला आणि आपले शिक्षक आपल्या शाळेतच हजर झाले पाहिजे अशा पद्धतीचे आंदोलन केले तर पुन्हा एकदा या प्रशालेत फक्त एकच शिक्षक राहणार आहे. याबाबतही शिक्षण विभागाने योग्य ती विचार करून दोन दिवसात लेखी पत्र ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीला द्यावे असेही यावेळी बोलताना लक्ष्मी पेडणेकर आणि शितल मसुरकर यांनी सांगितले. मसुरे केंद्र शाळेच्या शिक्षण विभागाकडून होत असलेल्या अनागोंदी कारभारा संदर्भात ओरोस येथे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांची मसुरे केंद्र शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ आणि मुसरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी लेखी निवेदनाद्वारे सुरवातीला आपली कैफियत मांडली. यावेळी संजय कापडणीस यांनी सुद्धा ऐन परीक्षा काळात झालेल्या बदलांबाबत आश्चर्य व्यक्त करून लगेचच दिलेल्या निवेदनाची प्रत शिक्षण विभागाकडे पाठवून योग्य ती कार्यवाही करून सदर प्रशालेला न्याय मिळवून द्यावा असे सूचना शिक्षण विभागाला केल्यात. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस आणि शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांचे आभार व्यक्त केले.यावेळी लक्ष्मी पेडणेकर,शीतल मसुरकर,ज्योती पेडणेकर,अनिरुद्ध बागवे, दिनकर दुखंडे, संभा सागवेकर, अजिजुर चिस्ती,मयुरी शिंगरे, स्वरा नार्वेकर मॅडम, शारदा मोरे, आदी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते..

यावेळी बोलताना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शितल मसुरकर म्हणाल्यात येत्या दोन दिवसात या प्रशालेचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही आंदोलन करण्यावरती ठाम राहणार आहोत. तर माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर म्हणाल्यात मसुरे केंद्र शाळेवर शिक्षण विभागाने अन्यायकारक बदल्यान संदर्भात जो प्रश्न निर्माण केला आहे या प्रश्नासंदर्भात आज सनदशीर मार्गाने आम्ही शिक्षण विभागाचे लक्ष वेधले आहोत. येत्या दोन दिवसात शिक्षणाधिकारी गणपत कमळकर यांच्या आदेशानुसार जर शिक्षण विभागाने योग्य ती कारवाई केली नाही तर या विभागा विरुद्ध मसुरे ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि येथील लोकप्रतिनिधी सुद्धा आंदोलन छेडणार आहेत. या प्रश्नाबाबत माजी उपसभापती छोटू ठाकूर यांनी सुद्धा संबंधित विभागाचे दूरध्वनी वरून लक्ष वेधून सदरच्या शाळेचा प्रश्न तत्काळ सोडवण्यासंदर्भात मागणी केली आहे अन्यथा आम्ही सर्व या प्रशालेच्या मागे खंबीरपणे उभे राहू असे यावेळी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. ओरोस येथे शिक्षणाधिकारी यांच्यासमोर मालवण तालुक्यातील त्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थांचे साधे फोनही उचलत नसल्याबाबत आणि निर्माण झालेल्या शिक्षकांच्या प्रश्नाबाबत गेले दोन दिवस लक्ष न देणाऱ्या त्या अधिकाऱ्याविरुद्ध थेट नाराजी व्यक्त केली. सोशल मीडिया आणि वृत्तपत्रातून या शाळेच्या प्रश्नासंदर्भात बातम्या प्रसिद्ध होतात मालवण मधील त्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने सदर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाला फोन करण्याचे सौजन्य आज दाखविले हेच सौजन्य चार दिवसांपूर्वी दाखविले असते तर येथील ग्रामस्थांना ओरोस येथे खाजगी गाड्या घेऊन जाण्याचा नाहक खर्च माथी बसला नसता असे यावेळी शिक्षणाधिकारी यांच्या दालनामध्ये येथील ग्रामस्थांनी सांगितले.

 

फोटो: ओरस येथे शिक्षणाधिकारी गणपत कमळकर यांना मसुरे केंद्र शाळेच्या वतीने शिक्षक प्रश्न संदर्भात निवेदन देताना मसुरे माजी सरपंच लक्ष मी पेडणेकर शितल मसुरकर आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य.पोरस येते प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांना निवेदन देताना.