Home स्टोरी मसुरे केंद्र शाळा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी.

मसुरे केंद्र शाळा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी.

186

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): बाळ गंगाधर टिळक हे भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक म्हणून ओळखले जातात. गंगाधर जी हे भारतीय राष्ट्रीय चळवळीचे पहिले नेते होते. बाळ गंगाधर टिळक हे बहुमुखी प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्त्व होते. ते शिक्षक, वकील, समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्रीय नेते होते. इतिहास, संस्कृत, खगोलशास्त्र आणि गणित या विषयांत त्यांचे प्राविण्य होते. बाळ गंगाधर टिळकांना लोक प्रेमाने ‘लोकमान्य’ म्हणायचे. श्री दाजीसाहेब प्रभूगावकर केंद्र शाळा मसुरे नं.१ या शाळेत लोकमान्य टिळकांचीची 103 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी् अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांमधून मिहिर शैलेश मसुरकर याने लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत अध्यक्ष स्थान भूषविले.केंद्रप्रमुख श्री.नारायण देशमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी सावंत ,विनोद सातार्डेकर, गोपाळ गावडे ,रामेश्वरी मगर, शिपा शेख,हेमलता दुखंडे इ. व्यासपीठावर उपस्थित होते.प्रमुख वक्ता म्हणून श्री विनोद सातार्डेकर सर यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनातून आपण काय घेतले पाहिजे, विद्यार्थी दशेत असताना लोकमान्य टिळक कसे घडले याविषयी प्रतिपादन केले.इयत्ता पहिली ते आठवीतील कु.निधी पेडणेकर , देवेश साटम , लावण्या दुखंडे , गौरांग दुखंडे, करुनेश नार्वेकर , स्वरा तोंडवळकर , काव्या फरांदे, समर्थ शिंगरे, आलिया शेख, रमेश मुळये, वैभवी शिंगरे , यज्ञा परब, क्रिशा दुखंडे, स्वानंदी हिंदळेकर, मिहीर मसुरकर, जयश्री जंगले, आयान शेख, संकेत गोलतकर, शिवांग मौर्या, प्रथमेश आईर, मानवी शिंगरे, मानसी मुळये, अंकिता मोरे, वैष्णवी तोंडवळकर, नंदिनी आंबेरकर, आर्या तोंडवळकर, अमेय मेस्त्री, सिद्धी वंजारे, कोमल सावंत, यश बागवे, ओंकार गावडे, आर्यन परब, श्रेया मगर, नेहा शिंगरे, समर्थ दुखंडे, सुरज मसुरकर, आयुष दुखंडे, चैतन्य भोगले, दर्शित पेडणेकर अनेक विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.मानसी पेडणेकर व कु.जान्हवी सावंत यांनी केले. तर आभार कु.सान्वी हिंदळेकर हिने मानले.