Home स्टोरी मसुरे केंद्र शाळा येथे गुरुनाथ ताम्हणकर यांचा हृदय सत्कार.

मसुरे केंद्र शाळा येथे गुरुनाथ ताम्हणकर यांचा हृदय सत्कार.

129

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): श्री .गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर जि.प.आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक, मनमिळावू स्वभावाचे,एक उपक्रमशील विद्यार्थी प्रिय शिक्षक ,हरहुन्नरी,तंत्रस्नेही शिक्षक , समाजातही आपल्या दिलदार स्वभावाची छाप पाडणारे, मदतकार्यात सदैव पुढे असणारे. असे श्री.ताम्हणकर सर यांनी केंद्रशाळा मसुरे नं.१ येथे प्रदीर्घ ११ वर्ष सेवा बजावली आहे. त्यानां पुढील जीवनासाठी सदिच्छा देण्याचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक *28 जुलै 2023* रोजी प्रशालेमध्ये शितल मसुरकर यांच्या अध्यक्षतेखालीसंपन्न झाला. त्यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष सौ. शितल मसुरकर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, केंद्रप्रमुख श्री नारायण देशमुख,उपाध्यक्ष श्री. संतोष दुखंडे, उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी सावंत, पत्रकार तथा माजी अध्यक्ष श्री.दत्तप्रसाद पेडणेकर,ग्रामपंचायत सदस्य सौ.भक्ती भोगले.श्री.गोपाळ ठाकूर, श्री.नरेंद्र हिंदळेकर, श्री.नंददीपक साटम, सौ.ज्योती पेडणेकर, बापू मसुरेकर, सौ.सायली दुखंडे, सौ.समिधा गोलतकर, सौ.मयुरी शिंगरे, सौ.मोर्या, श्री.विनोद सातार्डेकर, श्री.गोपाळ गावडे, श्री.प्रसाद कदम ,सौ.रामेश्वरी मगर, शिफा शेख, सौ.हेमलता दुखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

अकरा वर्षांच्या मसुरे केंद्र शाळा येथील केलेली उत्तुंग कामगिरी कौतुकास्पद होती. अनेक वक्त्यांच्या भाषणातून गुरुनाथ ताम्हणकर यांच्या अनेक पैलुं विषयी बोलण्यात आलं. या प्रसंगी विद्यार्थी मनोगते.. मिहीर मसूरकर ,आर्या तोंडवळकर ,मानवी शिंगरे,काव्या फरांदे, अरुंधती चव्हाण ,समर्थ शिंगरे,मानसी पेडणेकर ,समर्थ दुखंडे,आयुष दुखंडे, चैतन्य भोगले,श्रेया मगर,नेहा शिंगरे, सुरज मसुरकर, तर शिफा शेख, रामेश्वर मगर, गोपाळ गावडे, विनोद सातार्डेकर, मुख्याध्यापिका शर्वरी सावंत , संन्मेश मसुरेकर,दत्तप्रसाद पेडणेकर ,केंद्रप्रमुख देशमुख सर, लक्ष्मी पेडणेकर , प्रसाद कदम सर,अध्यक्ष शीतल मसुरकर, आदींनी आपली मनोगतं व्यक्त केली.

प्रशालेच्या वतीने मानपत्र, शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. मानपत्र वाचन श्री गावडे सर यांनी केले.तर कार्यक्रमाच्या शेवटी सत्कार मूर्ती श्री, गुरुनाथ ताम्हणकर सर सत्काराला उत्तर देताना म्हणाले, “मी सगळे हे जे केलं,विद्यार्थी व माझ्या सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे मला साध्य झालं.कोणतही काम हे टीमवर्क शिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणून त्याचं सगळं श्रेय विद्यार्थी आणि माझ्या सहकारी शिक्षकांना मी देतो. शेवटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार श्री विनोद सातार्डेकर सर यांनी मानले. यावेळी पाच हजार रुपये ची देणगी प्रशालेसाठी ताम्हणकर यांनी दिले तसेच सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही केलं.