मुख्याध्यापिका शर्वरी सावंत यांचा चांगला उपक्रम..
मसुरे प्रतिनिधी:
सध्याच्या शहरीकरणामुळे त्याचप्रमाणे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबांचे प्रेम नातवंडांना पूर्वीप्रमाणे मिळत नाही. मुलांचा मायेने सांभाळ करणाऱ्या आजी-आजोबांची माया – ममता मुलांना संस्कारित होण्यास फायदेशीर ठरते हे या निमित्ताने आपल्याला आधुनिक युगातील मुलांना दाखवून द्यायचे आहे. मुलांची जडणघडण होत असताना आजी आजोबांचे प्रेम मिळणे ही एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट असते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याची आवश्यकता असते. याचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हा परिषद केंद्र शाळा मसूरे नं1 या प्रशालेत प्राध्यापिका शर्वरी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांचे आजी आजोबा एका अनोख्या विश्वात रमले होते त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसांडून वाहत होता.
विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांचं पाद्यपूजन करून औक्षण केले. प्रशाला मुख्याध्यापिका शर्वरी सावंत यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन आजीआजोबांचे स्वागत करण्यात आले, आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत गायन, संगीत खुर्ची, बादली चेंडू टाकने असे विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. आजी आजोबांना नातवंडांच्या नात्याला नवीनच उजाळा व दुवा म्हणून संवाद साधण्याचा अनुभव मिळाला असे प्रतिपादन श्री विनोद सातार्डेकर यांनी प्रास्ताविकात केले.याप्रसंगी सुनिता घनश्याम शिंगरे ,सुरेश दौलत मसूरकर सत्यवान महादेव गोलतकर, सुषमा सुरेश मसुरकर, आदम मोहम्मद खान मनीषा गोपाळ ठाकूर ,सावित्री सत्यवान गोलतकर, हेमलता लीलाधर दुखंडे, मधुसूदन लक्ष्मण लाड आदींनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं. आजोबांच्या नातवंडानी आजोबांविषयी आपले मनोगते सांगितली.संगीत खुर्ची स्पर्धेतील विजेता आदम खान व उपविजेते सुरेश मसुरकर तसेच बादली चेंडू स्पर्धेतील विजेते सुषमा मसुरकर उपविजेते हेमलता दुखंडे ,मनीषा ठाकूर यांचे पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देऊन अभिनंदन करण्यात आले. सर्व खेळाचे परीक्षक म्हणून गोपाळ गावडे, रामेश्वरी मगर, शिपा शेख यानी काम पाहिले.सूत्रसंचालन विनोद सातार्डेकर तर आभार गोपाळ गावडे मानले.या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.शितल मसुरकर उपाध्यक्ष श्री.संतोष दुखंडे, श्री.सन्मेश मसुरेकर ,माजी अध्यक्ष श्री.दत्तप्रसाद पेडणेकर, केंद्रप्रमुख श्री.नारायण देशमुख यांनी शुभेच्छा दिल्यात. स्पर्धेतील सर्व विजेत्या आजी आजोबांचे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, आदर्श शिक्षक शिवराज सावंत, मर्डे सरपंच संदीप हडकर, माजी जी प अध्यक्ष संग्राम प्रभू गावकर, माजी जी प अध्यक्ष सरोज परब, छोटू ठाकूर, उपसरपंच पिंट्या गावकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सर्व शिक्षक वर्ग ग्रामस्थ पालक यांनी अभिनंदन केले आहे.