Home स्टोरी मसुरे केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत देऊळवाडा प्राथमिक शाळा प्रथम!

मसुरे केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत देऊळवाडा प्राथमिक शाळा प्रथम!

147

सौ. आदिती मेस्त्री यांच्या पाककृतीची तालुकास्तरावर निवड….

मसुरे केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत देऊळवाडा प्राथमिक शाळा प्रथम!

मसुरे प्रतिनिधी:

 

प्रधानमंत्री पोषणशक्ती अभियान अंतर्गत मसुरे केंद्रस्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धेत प्राथमिक शाळा देऊळवाडा शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ. आदिती अमोल मेस्त्री यांनी बनविलेल्या “मिक्स तृणधान्याचे आप्पे” या पाकृतीने प्रथम क्रमांक पटकावला. या पाककृती स्पर्धेमध्ये मसुरे केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या पालकांसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. नाचणी, वरी, गहू, तांदूळ यांसारख्या विविध धान्यांचा वापर करुन शेवया, मोदक, लाडू, धपाटे असे अनेक पदार्थ बनवून आकर्षक सजावटीसह मांडणी केली होती.

केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने तृणधान्य विषयक जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. याला अनुसरूनच पालक व नागरिक यांच्यासाठी तृणधान्य आधारित पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक एकूण नऊ शाळांनी भाग घेतला

या स्पर्धेचे परीक्षण गटसाधन केंद्र मालवणच्या विषय तज्ञ सौ. आरती कांबळी व श्री. विकास रुपनर यांनी केले. आरोग्य विषयक लाभ, चव, मांडणी, इंधन बचत या मुद्द्यांआधारे परीक्षण करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी केंद्रप्रमुख श्री नारायण देशमुख, मुख्याध्यापिका सौ. शर्वरी सावंत, माजी सरपंच सौ लक्ष्मी पेडणेकर, सौ शीतल मसुरकर व केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.

या स्पर्धेतील यशाबद्दल देऊळवाडा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सदानंद कबरे, मुख्याध्यापक श्री. प्रशांत पारकर, सर्व शिक्षक व पालकांनी विशेष अभिनंदन केले आहे. तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.