Home स्टोरी मसुरे कावा शाळा येथे तृणधान्य पाककृती स्पर्धेस प्रतिसाद!

मसुरे कावा शाळा येथे तृणधान्य पाककृती स्पर्धेस प्रतिसाद!

151

 

सौ.मयुरी पेडणेकर यांचा प्रथम क्रमांक….

 

 मसुरे प्रतिनिधी:

 

मसुरे कावा शाळा येथे आयोजित तृणधान्य पाककृती स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे परीक्षण आरोग्य सेवक श्री. सिद्धेश धुरी आणि सौ.नेरूरकर यांनी केले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ.मयुरी मंगेश पेडणेकर, द्वितीय क्रमांक सौ.मनस्वी विरेश येसाजी, आणि तृतीय क्रमांक सौ.दिव्या दिपक कातवणकर यांचा आला.

श्री.धुरी आणि सौ.नेरूरकर यांनी आहारातील तृणधान्याचे महत्व समजावून सांगितले.प्रथम तीन क्रमांकाना,व सहभागी गृहिणींना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यशस्वी आणि सहभागी स्पर्धकांचे मुख्याध्यापिका सौ.सुखदा मेहेंदळे, अध्यक्ष पंढरीनाथ मसुरकर, उपाध्यक्ष सावली कातवणकर, शाळा व्यवस्थापन समिती मसुरे कावा यळआणि मसुरे भंडारी समाज सेवा संघाने अभिनंदन केले आहे.मुख्याध्यापक सौ.सुखदा मेहेंदळे यांनी प्रास्ताविक तर आभार प्रशालेचे शिक्षक सुहास गावकर यांनी मानले.