मसुरे प्रतिनिधी:
मसुरे कावा शाळा येथे आजी आजोबा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात श्री.व सौ रंगराव येसाजी, श्री.व सौ.विष्णू गिरकर,श्री.व सौ.कृष्णा कातवणकर, श्री.व सौ.दिगंबर गोलतकर,श्रीम् भाग्यश्री राणे, श्रीम्.सरोजनी जुवेकर, ,श्री.व सौ. कृष्णा पेडणेकर आदी आजी आजोबा उपस्थित होते.प्रत्येकाने आपल्यातील कलागुणांना वाव देत सादरीकरण केले.प्रास्ताविक सुहास गावकर, आभार मुख्याध्यापिका सौ सुखदा मेहेंदळे यांनी मानले.