मसुरे प्रतिनिधी: मसुरे कावावाडी येथील तीन घरांवर वडी हे महाकाय जंगली झाड कोसळून लाखोंचे नुकसान झाले. सदर घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. सर्व घरातील माणसे काम करत असताना किरकोळ दुखापत वगळता सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. तिन्ही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी संबंधित घर मालकांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल, पोलीस तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत नुकसानीचा आढावा घेतला तसेच जखमीना वैद्यकीय मदत व्हावी यासाठी प्रयत्न केले.मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनी नुकसानीची माहिती घेतली. शुक्रवारी दुपारी समीर वस्त हे आपल्या घरात जेवण करून आराम करत असताना मोठा आवाज होऊन घरावर काहीतरी पडल्याचे त्यांना जाणवले. तातडीने त्यांनी झोपेतून उठून घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांच्या डोक्याला तसेच हाताला सुद्धा दुखापत झाली. हाताला पाच टाके घालण्यात आले असून उजवा हात जायबंदी झाला आहे. पांडुरंग पाटील यांच्या घरात सुद्धा त्यांची पत्नी जेवण करत असताना या झाडासह बाजूला असलेला माड त्यांच्या पूर्ण घरावर पडल्यामुळे त्यांच्या घराचे सुद्धा नुकसान झाले. तर हे झाड माडावर पडल्यामुळे माडाचा पूर्ण शेंडा किरण पाटील यांच्या किचन असलेल्या खोलीमध्ये पडला. लोखंडी छपरावर असलेले पत्रे तसेच छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी सुद्धा या घरात महिला काम करत होत्या परंतु सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. गोविंद भाऊ पाटील, राजश्री बाळकृष्ण वस्त, गोपाळ भाऊ पाटील, मुरलीधर भाऊ पाटील, कल्पना कमलाकर पाटील, शंकर पाटील, रमेश पाटील, चंद्रकांत मेघश्याम पाटील, सुचिता शंकर पाटील यांच्या एकत्रित मालकीची ही तीन घरे आहेत. गटविकास अधिकारी आत्मज मोरे, मसुरे वैधकीय अधिकारी डॉ. अभिजित फराकटे, वि. अधिकारी सूरज बांगर, आरोग्य सेवक सिद्धेश धुरी, आरोग्य सहा. श्री पारकर, श्री कदम, मसुरे ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुलकर, मंडळ अधिकारी सुहास चव्हाण, तलाठी वाय. बी. राजूरकर, डॉ विश्वास साठे, पोलीस विवेक फरांदे, पो पा. सौ प्रेरणा येसजी, कोतवाल सचिन चव्हाण, ग्राम कर्मचारी विनोद मोरे, शैलेश मसुरकर यांनी नुकसानीची माहिती घेतली.
ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवत कोसळलेले झाड घरावरून खाली घेण्यास मोठी मदत केली. शिवाजी परब,दया देसाई, तात्या हिंदळेकर, बाबू मसुरकर, पंढरीनाथ मसुरकर, संजय बांदकर, बाबू येसजी, किरण पाटील, समीर पेडणेकर, सुहास पेडणेकर, चंद्रसेन पाटील, किशोर पाटील, सतीश मसुरकर, धनेश हिंदळेकर, सचिन पाटकर,जीवन मुणगेकर, सागर पाटील, राजू मालवणकर, सचिन कातवनकर, जितेंद्र मसुरकर, विजय पेडणेकर, हिंदळेकर, बंटी मुणगेकर, शंकर हडकर, राणे, साई बागवे, बाळू दळवी, राजू सावंत आदी अनेक ग्रामस्थांनी मदत कार्यात सहभागी दर्शवला.