मसुरे प्रतिनिधी: मसुरे कावावाडी येथील चार घरावर वडाचे झाड कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार वैभव नाईक यांनी त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली तसेच आर्थिक मदतही केली.
यावेळी माजी जी. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विश्वास साठे, विभागप्रमुख राजेश गावकर, विभागप्रमुख विजय पालव,अमित भोगले, राहुल सावंत, सुहास पेडणेकर, पंढरी मसुरकर,सतीश मसुरकर,वासू पाटील,बाबू मसुरकर,पांडू पाटील,कृष्णा पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते.