Home शिक्षण मसुरे एज्युकेशन सोसायटी चे शैक्षणिक क्षेत्रात मोठे नाव आहे! डॉक्टर दीपक मुळीक….

मसुरे एज्युकेशन सोसायटी चे शैक्षणिक क्षेत्रात मोठे नाव आहे! डॉक्टर दीपक मुळीक….

213

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): मसुरे एज्युकेशन सोसायटी चे शैक्षणिक क्षेत्रात जिल्ह्यामध्ये मोठे नाव आहे. विद्यार्थ्यांना नेहमी चांगले शिक्षण, त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी सध्याच्या आधुनिक युगात रोजगार कसा निर्माण होईल यासाठी या प्रशालेच्या वतीने नेहमीच स्तुत्य असा प्रयत्न केला जातो. आजही येथील गुणवंतांच्या पाठीशी या संस्थेने या संस्थेच्या विविध दात्याने जी कौतुकाची थाप मारलेली आहे याचा उपयोग तुम्ही सर्व गुणवंतांनी आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी करावा, या प्रशालेतून तुम्ही शिकून मोठे व्हाल तेव्हा या प्रशाले कडे या संस्थेकडे सुद्धा तुम्ही आदराने बघा कारण ही संस्था ही शाळा भविष्यात तुम्हालाच पुढे न्यावयाची आहे असे प्रतिपादन मसुरे आर पी बागवे हायस्कूल येथे बोलताना या संस्थेचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब यांनी केले.

मसुरे एज्युकेशन सोसायटी

मसुरे आर. पी. बागवे हायस्कूल येथे शिक्षण महर्षी मदन राजाराम बागवे पुरस्कार वितरण आणि संस्थेकडे ठेवलेल्या विविध दात्यांच्या रकमेतून येणाऱ्या व्याजातून रोख रकमेच्या पैशातून इयत्ता दहावी, बारावी आणि पाचवी ते नववी तसेच मसुरे केंद्र, तालुका, जिल्हा स्तरीय दहावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव कार्यक्रम डॉक्टर दीपक मुळीक परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी सुमारे 80 हजाराच्या रोख रुपये रकमेच्या बक्षिसाचे वितरण गुणवंत विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने डॉक्टर दीपक परब यांना कोकण आयडॉल पुरस्कार आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स च्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला करण्यात आला.

बिळवस ग्रामपंचायत च्या वतीने सुद्धा डॉक्टर दीपक मुळीक परब यांचा सरपंच मानसी पालव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर दीपक परब यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्यात. यावेळी बोलताना मुंबई संस्थेचे माजी सेक्रेटरी जेडी बागवे म्हणालेत आज या संस्थेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी या संस्थेने उपलब्ध करून दिलेले आहेत भविष्यात परिसरातील विद्यार्थ्यांनी या प्रशालेमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचा फायदा करून घ्यावा विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी मसुरे एज्युकेशन सोसायटी आणि आम्ही सर्व सदैव पाठीशी आहोत. बिळवस सरपंच मानसी पालव म्हणाल्यात मसुरे एज्युकेशन सोसायटी आज मसुरे गावामध्ये ज्ञानदानाचे अनोखे असे कार्य करत आहे याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपली शैक्षणिक उन्नती साधावी. जिल्हा, तालुका, केंद्र आणि शाळा स्तरावरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रुपयाची बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष उत्तम राणे, माजी सेक्रेटरी जयराम बागवे, मुंबई कमिटी सदस्य संजय बागवे, सुभाष बागवे ,महेश बागवे, सरोज परब, बिळवस सरपंच मानसी पालव, मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना कोदे, सखाराम कांबळे, विठ्ठल लाकम, आकाश मसुरकर, बाबुराव प्रभू गावकर, सोनोपंत बागवे, प्रकाश परब, राजन परब, मिलिंद प्रभू, रमेश चव्हाण, सोमाजी परब, उद्योजिका राधिका परब, शुभा प्रभू मॅडम, चौगुले सर, शशांक पिंगुळकर, मसुरेकर मॅडम, समीर नाईक, हळवे सर, बी एस ठाकूर, एन एस जाधव, दयानंद पेडणेकर, जगदीश चव्हाण दत्तप्रसाद पेडणेकर, भानुदास परब, चरणदास फुकट, बाबाजी मेस्त्री, विशाखा जाधव, संस्थेचे सदस्य, प्रशालेतील माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रशालेचा माजी विद्यार्थी श्री आकाश संतोष मसुरकर याची निवड महाराष्ट्र टेनिस क्रिकेट टीम मध्ये झाल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.

यावेळी आकाश मसुरकर यांनी संस्थेने केलेल्या सत्काराबद्दल प्रशालेचे आभार व्यक्त केले.प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना कोदे, सूत्रसंचालन विशाखा जाधव, आभार एस आर कांबळे यांनी मानले.फोटो प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर दीपक मुळीक परब यांचा नागरी सत्कार करताना श्रीमती अर्चना कोदे, महेश बागवे, संजय बागवे,उत्तम राणे, जे डी बागवे, मानसि पालव, सरोज परब आणि मान्यवर.

छाया: शैलेश मसुरकर