मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): श्री दाजी साहेब प्रभूगावकर केंद्रशाला मसुरे नंबर १च्या विद्यार्थ्यांच्या पावसाळी कविता सादरीकरण आणि गायनाचा कार्यक्रम श्री घनशाम मुळये परब यांच्या निवासस्थानी नुकताच पार पडला. केंद्र शाळेच्या या सर्व विद्यार्थ्यांनी मसुरे गावामध्ये कवितांचा अनोखा पाऊस पा. या कवितांच्या पावसामध्ये मसुरे गाव ओला चिंब भिजून गेला.
या प्रसंगी कार्यक्रमाला मुख्याध्यापिका शर्वरी सावंत, केंद्रप्रमुख देशमुख सर, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष शितल मसुरकर, उपाध्यक्ष श्री.संतोष दुखंडे, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, सन्मेष मसुरेकर, सौ ज्योती पेडणेकर, श्री घनश्याम मुळये परब्, गीतांजली मुळये परब, गोपाल गावडे, विनोद सातार्डेकर, रामेश्वरी मगर, शिफा शेख, हेमलता दुखंडे, आदि मान्यवर उपस्थिती होते.
जिल्हा परिषद केंद्र शाळा मसुरे ही प्रशाला दरवर्षी आपल्या प्रशालेच्या वतीने विविध अनोखे उपक्रम विद्यार्थी, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्य जोपासण्यासाठी करत असते. असाच एक अनोखा उपक्रम त्यांनी नुकताच सादर करताना विद्यार्थ्यांना निसर्गाची आवड व्हावी आणि स्वरचित कविता निर्माण करता याव्यात यासाठी निसर्गाच्या सानिध्यात एक कविता पावसावरची हा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रत्यक्ष निसर्गात जाऊन कविता सादरीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या उपक्रमाला प्रशालेतून उदंड प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून लाभला. अनेक विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता बहारदार पद्धतीने सादरीकरण करून वाहवा मिळवली. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यात इयत्ता पहिलीतुन निधी दीपक पेडणेकर हिने पावसावर कविता सादर करुन आनंद घेतला. काव्या फरांदे, समर्थ शिंगरे, मिहीर मसुरकर् , स्वानंदी हिंदळेकर, अरुंधती चव्हाण, क्रीशा दुखंडे, लतिबा सय्यद, जयश्री जंगले ,भार्गव ठाकूर, आयन् शेख, संकेत गोलतकर, चैतन्य भोगले, समर्थ दुखंडे, सुरज मसुरकर, नेहा शींगरे, मानसी पेडणेकर, जान्हवी सावंत, आर्या गांवकर,जोबीया सय्यद, श्रेया वंजारे, कृपा पाटील, वैष्णवी तोंडवळकर, मुस्कान खान, कोमल मोंडकर, मानवी शिंगरे, अंकिता मोरे, मानसी मुळये आदि मुलांनी एकापेक्षा एक बहारदार कविता आणि गीत गायन उत्तमरित्या सादरीकरण करून वाहवा मिळवली.
संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन श्रेया मगर हीने केले. तर आभार रिया भोगले हिने मानले. या सादरीकरणाला संगीत साथ हार्मोनियम श्री गोपाळ गावडे सर, चैतन्य भोगले, ढोलकी आणि तबला विनोद सातार्डेकर यांनी दिली. सर्व मान्यवरांचे स्वागत केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शर्वरी सावंत यांनी करून या संपूर्ण कार्यक्रमाला सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री नंदू दादा परब आणि त्यांच्या परिवाराचे आभार व्यक्त केले.या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मसुरे केंद्र शाळेच्या या अनोख्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात.