Home स्टोरी मसुरेतील भरतगड येथे २० जून रोजी ‘रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास...

मसुरेतील भरतगड येथे २० जून रोजी ‘रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद संस्थेचा’ स्थापना सोहळा.  

96

मसुरे प्रतिनिधी: 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे भरतगड किला येथे रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद या नवीन संस्थेच्या स्थापना कार्यक्रमाचे आयोजन २० जून रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत करण्यात आले आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत सावंत यांनी याबाबत माहिती देताना सांगितले आहे की दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही संस्था स्थापन करत आहोत. यामध्ये दोन्ही जिल्ह्यातील रहिवासी, जिल्ह्यांबाहेर रहाणारे जिल्ह्यांतील रहिवासी तसेच जे देशभर आहेत व परदेशात आहेत त्यांनी या संस्थेशी जोडले जावे व सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या ३५० व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून ही संस्था स्थापन होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी सकाळी नऊ वाजता मसुरे पावणाई मंदिर ते भरतगड किल्ला रॅली निघणार आहे या रॅलीमध्ये सर्व शिवप्रेमींनी तसेच मसुरे ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केले आहे..