Home स्टोरी मसदे वडाचापाट श्री स्वामी समर्थ मठ येथे ४ सप्टेंबर रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन !

मसदे वडाचापाट श्री स्वामी समर्थ मठ येथे ४ सप्टेंबर रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन !

257

श्री श्री १०८ महंत प. पु. सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचे अध्यात्मिक मागदर्शन

 

मसुरे प्रतिनिधी:

 

मसदे वडाचापाट येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे श्रावण सोमवार निमित्त ४ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ : ०० वा.श्री स्वामी समर्थांची पुजा अर्चा,,पालखी आणि पादुका पुजन, सकाळी ८ वा. ११श्रीसत्यनारायण महापूजा, श्री श्री १०८ महंत प पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचे आगमन आणि अध्यात्मिक मागदर्शन तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार,मनोगते,शालेय बक्षीस वितरण सोहळा, दुपारी

१:३० वा. श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवैद्य आणि महाप्रसाद, रात्रौ ठिक ७ वा संगीत विद्यालय आचरा बाजारपेठ बुवा श्री राठवड यांचे भजन, रात्रौ ठिक ८ वा आकारी ब्राम्हण देव प्रासादिक भजन मंडळ कातवड, मालवण बुवा श्री रामचंद्र धुरी यांचे भजन, रात्रौ ठिक ९ वा श्री देवी भगवती वशिक प्रासादिक भजन मंडळ मुणगे, ता देवगड बुवा कुमार अथव॔ सोनु सावंत यांचे भजन.

तरी सेवेकरी, भाविक, भक्तांनी दर्शन, तीर्थ – प्रसाद, आणि (महाअन्नदान) महाप्रसादाचा लाभ घ्यावाअशी विनंती मठाच्या वतीने करण्यांत आली आहे.अधिक माहिती साठी (942 35 38 418, 982 17 19 111) येथे संपर्क साधावा.