मसुरे प्रतिनिधी: श्री श्री १०८ मह॑त मठाधिश परम पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांच्या ५९ व्या वाढदिवसा निमित्त श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी श्री स्वामी समर्थ महाराज मुर्तीवर आणि पादुकावर गावडे काका महाराज यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुषी होणेसाठी दुग्ध आणि जलाभिषेक आणि सामुहिक जप करण्यात आला. वाढदिवस निमित्त मालवण तालुक्यातील आचरा, मसुरे, वडाचा पाट,चाफेखोल गावातील अंगणवाडीत शिकणाऱ्या ५९ विद्यार्थ्यांना स्कुल बँग वितरण करण्यात आले.
अंगणवाडी आचरा वरची वाडी केंद्र क्रमांक १ आणि अंगणवाडी आचरा देऊळवाडी केंद्र क्रमांक ०२ येथील ३८ विद्यार्थी विद्यार्थिना स्कुल बॅग चे वितरण करण्यात आले. सेविका ऊषा बबन चव्हाण, मदतनीस रेणुका रमेश घारे, गणपत मोननकर,तेजश्री दिपक खुळे, शुभदा कमलाकर मालवणकर, सायली संतोष घाडी आदी सह श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाटचे केंद्र प्रमुख साईप्रसाद पेडणेकर, उमेश मुणगेकर, तानाजी पाटील, चंद्रसुहास घाडी, विनोद लब्दे आदी उपस्थित होते.