Home क्राईम मळगाव येथील युवकाची ऑनलाइन फसवणूक.

मळगाव येथील युवकाची ऑनलाइन फसवणूक.

214

सावंतवाडी: तालुक्यातील मळगाव येथील सायबर कॅफे चालवणाऱ्या युवकाला अज्ञाताने तब्बल ३८ सहस्र ऑनलाइन फसवणूक झाली आहे. गुगल पे हॅक करून आपली फसवणूक झाली, असे संबंधित युवकाचे म्हणणे आहे. ही घटना दि.४ ऑक्टोबर दिवशी घडली. मात्र हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

ऋत्विक तळकटकर असे तरुणाचे नाव आहे. याविषयी सायबर क्राईम कडे तक्रार देण्याचा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला आहे. तळकटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे गुगल पे अकाउंट अचानक बंद पडले. दि.५ ऑक्टोबर सकाळी त्यांनी डिटेल्स तपासले असता खात्यातून पहिल्यांदा १ सहस्र ५००, त्यांनतर ३५००, ४५०० , ४२००, अशी वेळोवेळी एकूण ३८ सहस्र ५०० रुपयाची रक्कम वजा झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी झालेल्या प्रकार सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव सांगितला अशी माहिती त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील यांना दिली. त्यानुसार त्यांनी सायबर क्राईम कडे तक्रार करण्याचे सांगितले आहे.