सावंतवाडी: मळगाव गावासह आजूबाजूच्या पंचक्रोशीत गेले काही दिवस सतत BSNL चे नेटवर्क गायब होत आहे. यामुळे ग्राहकांचे तसेच शालेय विद्यार्थांचे हाल होत आहेत. हि सेवा तात्काळ सुरळीत करावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर, ऊपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, मळगाव ऊपविभाग अध्यक्ष राकेश परब व अन्य सहकाऱ्यांनी बीएसएनएल च्या सावंतवाडी येथील कार्यालयाला धडक दिली व येत्या २ दिवसात हि सेवा सुरळीत करण्याची मागणी केली. दरम्यान मळगाव गावातील ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे सदर समस्या निर्माण झाली असून या गावात येत्या २ दिवसात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी सहाय्यक अभियंता पाटील यांनी दिले आहे.
Home स्टोरी मळगाव पंचक्रोशीत वारंवार गायब होणाऱ्या BSNL मोबाईल नेटवर्क बाबत मनसेने वेधले अधिकाऱ्यांचे...