सावंतवाडी प्रतिनिधी: स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्रीय कमिटीचे अधिकारी जिल्हा परिषद व पंचायत समिती या खात्यातील संबंधित अधिकारी यांच्या पथकाने नुकतीच मळगाव ग्रामपंचायत व मळगाव गावात भेट देऊन संपूर्ण तपासणी केली व ग्रामपंचायत ने केलेल्या कामाचा या कमिटीने आढावा घेतला. यावेळी ग्रामविकास अधिकारी सौ. मयुरी बांदेकर यांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली. भारतीय संस्कृती प्रमाणे मळगाव ग्रामपंचायत प्रवेशद्वारावर ग्रामपंचायत सदस्य सौ निकिता बुगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचारती ओवाळली. तदनंतर ग्रामपंचायत सहभागृहामध्ये सरपंच सौ स्नेहल जामदार यांनी केंद्रीय समितीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकाऱ्यांचे स्वागत उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ग्रामपंचायत स्वच्छता अभियान अध्यक्ष गुरुनाथ गावकर यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ, कामगार क्षेत्रातील कुशल व अकुशल कारागीर आरोग्य खात्यातील कर्मचारी बचत गटांच्या महिला, अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स सीआरपी उपस्थित होत्या.