न्हावेली वार्ताहर: मळगाव गावातील कुंभार्ली, तेलकाटा, वेत्येरोड भागातील वीज गेले चार दिवस बंद असल्याने विद्यार्थी ॲानलाईन काम करणाऱ्या लोकांसह नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.त्यामुळे गावातील नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत.
गावातील विद्युत पुरवठा लवकर सुरळीत करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी महावितरणला केली आहे.याबाबत महावितरण सावंतवाडी ग्रामीणचे सहाय्यक अभियंता अनिकेत लोहार यांना विचारले असता त्यांनी वादळी वाऱ्यामुळे मेन लाईनमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात झाला.असल्याची माहिती दिली.लवकरच वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.