सावंतवाडी प्रतिनिधी: जिल्हा नियोजन मधून मंजूर मळगाव बादेकरवाडी येथील स्मशान भूमी सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन मळगांव सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्या हस्ते तर माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तसेच जिल्ह्याचे पालकमंंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या पुलाचे भूमीपूजन माजी आमदार राजन तेली साहेब यांच्या करण्यात आले. तर पांडुरंग राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. यावेळी मळगांव सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सभापती राजू परब, माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, माजी सरपंच निलेश कुडव, शक्तिकेंद्र प्रमुख निळकंठ बुगडे, तात्या लातये, दिपक जोशी, नवनाथ राऊळ, निखिल राऊळ, दादा परब, प्रमोद गावडे व कार्यकर्ते उपस्थित होते.