Home स्टोरी मला इंजेक्शन देऊन ठार मारण्याची शक्यता! – इम्रान खान यांचा आरोप….

मला इंजेक्शन देऊन ठार मारण्याची शक्यता! – इम्रान खान यांचा आरोप….

95

पाकिस्तान: पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे या दिवशी अटक करण्यात आल्यानंतर १० मे ला त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले. इम्रान खान यांचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात त्यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात बोलतांना मला विषारी इंजेक्शन देऊन ठार मारण्यात येईल, अशी भीती व्यक्त केली आहे. मला २४ घंट्यांमध्ये एकदाही प्रसाधनगृहात जाऊ दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला. इम्रान यांना येथील पोलीस लाईन कारागृहात ठेवण्यात आले आहे. तेथेच त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

१. इम्रान खान यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे नेते असद उमर यांच्यासह अन्य काही नेत्यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व जण न्यायालयाच्या परिसरात इम्रान खान यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते.

२. पीटीआय पक्षाचे नेते शाह महमूद कुरेशी म्हणाले की, आमची इम्रान खान यांना भेटू देण्यात आले नाही. आमची लढाई चालूच रहाणार आहे.