Home जाहिरात मलाही मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय! केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मलाही मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय! केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

122

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: राज्यात सध्या मुख्यमंत्रीपदावरुन चढाओढ सुरु आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ सुरु आहेत. त्यातच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्रीपदाची चढाओढ सुरु असतांना रामदास आठवले यांनीदेखील ‘मलाही मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय’ असं मत व्यक्त केले आहे. तसेच मुख्यमंत्री पदाच्या चढाओढीतून भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागणे हे हास्यास्पद असल्याचंही आठवले यांनी म्हटलयं. सांगलीमधील पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. अजित पवारांमुळे सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर बोलताना आठवले म्हणाले की, ‘अजितदादांना तिकडे संधी मिळेल असे वाटत नाही. आम्हाला अजितदादांची आवश्यकता नाही’ असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ सुरु असल्याचं आठवले यांनी म्हटलं. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत कोणालाही ती संधी मिळणार नसल्याचं स्पष्टीकरण देखील आठवले यांनी दिलं.

शरद पवार साहेबांनी एनडीए सोबत यायला पाहिजे, मी आलो आहे तर पावर साहेबांनी यायला हरकत नाही. शरद पवार यांनी आता ठोस पणे निर्णय घ्यावा. शरद पवारांनी आमच्या सोबत यावे’, असं मतदेखील मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होणाऱ्या जहरी टीकेवर बोलताना, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, ठाकरे हे आपले मित्र आहेत, तसेच ठाकरे सुसंस्कृत देखील आहेत. पण त्यांनी बोलताना भान ठेवून बोलावं.