Home स्टोरी मराठी भाषेचे संवर्धन काळाची गरज…! अण्णा झांट्ये.

मराठी भाषेचे संवर्धन काळाची गरज…! अण्णा झांट्ये.

88

आजगाव मराठी शाळेत मराठी दिन उत्साहात साजरा.

 

सावंतवाडी: मराठी ही आपली मातृभाषा आहे. मात्र अलीकडे इंग्रजीचे महत्त्व विनाकारण वाढत असून पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण देणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आजगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व आजगाव वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णा झांट्ये यांनी केले आहे. आजगाव विद्यालयाच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा येथे राजभाषा दिनाच्या कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर आजगाव शाळेच्या मुख्याध्यापिका मुख्याध्यापक ममता जाधव, पदवीधर शिक्षक दत्तगुरू कांबळी, उपशिक्षक श्रीम. रूपाली नाईक, निंगोजी कोकितकर, श्रीम. क्रांती हरमलकर, ग्रंथपाल श्रीम. प्रिया आजगांवकर, ग्रंथालयाच्या सहाय्यक श्रीम. रश्मी आजगांवकर आदी उपस्थित होते.

 

दरम्यान अण्णा झांट्ये पुढे म्हणाले, मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये चमकतो आहे. ही विशेष बाब लक्षात घेऊन मुलांना मातृभाषेतूनच शिक्षणाची गोडी लावावी. तसा अट्टाहास पालकांचाही असणे गरजेचे आहे.

 

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध ग्रंथांचे वाचन करून मराठीचा जागर केला.