Home स्टोरी मराठा महासंघाच्या वतीने सावंतवाडी शहरात तीन दिवस कमर्शियल व्हेईकल एक्स्पोचे आयोजन..! अभिषेक...

मराठा महासंघाच्या वतीने सावंतवाडी शहरात तीन दिवस कमर्शियल व्हेईकल एक्स्पोचे आयोजन..! अभिषेक सावंत

55

सावंतवाडी प्रतिनिधी: अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने दि. ८, ९ व १० मार्च रोजी कमर्शियल व्हेईकल एक्सपो २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. मराठा व ओबीसी व्यावसायिक वाहनधारकांसाठी ही रोजगाराची संधी असून या एक्सपोच्या माध्यमातून बिना व्याज व्यावसायिक वाहन खरेदी करण्याची सुवर्णसंधी असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष अभिषेक सावंत यांनी दिली.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत अभिषेक सावंत बोलत होते. यावेळी व्यापार उद्योग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, विशाल सावंत, दिगंबर नाईक, प्रशांत ठाकूर, आनंद नाईक, अभिजित सावंत , बापू राऊळ, शांताराम पारधी, प्रसाद राऊळ, आनंद आईर आदी उपस्थित होते.

 

अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गच्या आणि सिंधु विकास संशोधन व कौशल्य विकास संस्था, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठा उद्योजक डिरेक्टरी’ या उपक्रमा अंतर्गत २०२२ मध्ये कुडाळ येथे व्हेईकल एक्सपो घेतला होता. या यशस्वी प्रयोगानंतर ग्राहकांच्या उदंड प्रतिसाद आणि मागणीमुळे जिल्ह्यात दुसऱ्यांदा कमर्शियल व्हेईकल एक्सपो-२०२५ दि. ८, ९ व १० मार्च या कालावधीत सावंतवाडी बालोद्यान येथे आयोजित करण्यात आले आहे. मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे व्याज प्रतिपुर्ती योजना लागू केलेली आहे. सदर योजनेच्या धर्तीवर ओबीसी वर्गाकरी महाराष्ट्र शासनाने शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेमधून व्याज प्रतिपुर्ती लाभार्थ्यांना दिली जाते, असे त्यांनी सांगितले.

 

सदर दोन्ही योजनांमधून कर्जावरील व्याज हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून जमा केले जाते. परंतू सदर दोन्ही योजनांची शासनाच्या पातळीवर म्हणावी तशी प्रसिध्दी झालेली नाही.त्यामुळे बरेच व्यावसायीक वाहन खरेदीदार हे या दोन्ही योजनांच्या लाभांपासून वंचित राहतात. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे १५,००० परमीटधारक रिक्षा व १०००० पेक्षा जास्त मालवाहतूक करणारी वाहने आहेत. त्याचप्रमाणे खाजगीरीत्या पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या खूप आहे. मराठा महांसघामार्फत लोकांना व्यवसायाकरीता प्रेरीत करणे व त्यांना प्रोत्साहन देणे याकरीता अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सिंधुदुर्ग जिल्हयातील व्यावसायिक वाहनधारक व भविष्यात या व्यवसायात पदार्पण करू इच्छिणाऱ्या व्यक्तीकरीता कमर्शियल व्हेईकल एक्सपो २०२४ आयोजन करण्याचे ठरविलेले आहे. सदर कार्यक्रम हा सिंधुदुर्ग अॅऑटो रिक्क्षा चालक मालक संघटना व महाराष्ट्र राज्य ट्रक-टेंपो ट्रॅक्टर-बस वाहतुक महासंघ, मुंबई वा संघटनांच्या सहकार्या आयोजीत करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

 

सावंतवाडी मधील वाहन मेळाव्यात सुमारे २५ हजार व्यावसायिक जोडले गेले आहेत. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अँड सुहास सावंत यांनी मराठा आणि ओबीसी समाजातील व्यावसायिकांनी वाहने खरेदी करून रोजगार निर्माण करावा म्हणून शासन, महामंडळ, बँक आदींना एकत्रित करून योजना राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यात सर्व संबंधितांनी सहभागी होवून व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन अभिषेक सावंत यांनी केले आहे.

 

फोटो: अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत, शेजारी पुंडलिक दळवी, उमाकांत वारंग, दिगंबर नाईक, आनंद नाईक, विशाल सावंत आदी