Home स्टोरी मराठा आणि धनगर आरक्षणासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे !

मराठा आणि धनगर आरक्षणासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे !

110

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची पंतप्रधानांकडे मागणी !

३० ऑक्टोबर वार्ता: ४ दशकांपासून आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी मराठा आणि धनगर समाजाने अनेक आंदोलने आणि मोर्चे काढले आहेत. सध्या राज्यात ठिकठिकाणी त्यांच्याकडून आंदोलने चालू आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजांना जातीच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी २९ ऑक्टोबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.