Home स्टोरी मराठवाड्यात पावसाअभावी ३५ लाख हेक्‍टरवरील खरीपाची पिके धोक्‍यात !

मराठवाड्यात पावसाअभावी ३५ लाख हेक्‍टरवरील खरीपाची पिके धोक्‍यात !

79

अत्‍यल्‍प पावसामुळे मराठवाड्यातील खरीपाची उत्‍पादन क्षमता सरासरी ३५ ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत घटण्‍याचा अंदाज आहे. पुढील ८ दिवसांत मुसळधार पाऊस न झाल्‍यास ३५ लाख हेक्‍टरवरील संपूर्ण खरीप पिके धोक्‍यात येण्‍याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. पिकांना पाण्‍याची आवश्‍यकता आहे; मात्र सध्‍या पाऊस पडत नसल्‍याने पिके धोक्‍यात आली आहेत. त्‍यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील सर्वच जिल्‍ह्यांतील शेतकर्‍यांची दृष्‍टी आता पावसाकडे लागली आहे. मराठवाड्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर खरीपाच्‍या पिकांची पेरणी केली आहे.