सावंतवाडी प्रतिनिधी: शनिवार दि.१० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ३० वाजण्याच्या सुमारास सौ.दीक्षा चौकेकर यांनी राहत्या घराच्या गच्चीवर नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. परंतु संभंदीत मयत व्यक्तीच्या नतेवाहिकानी घटनास्थळी धाव घेत वस्तुस्थितीची पाहणी केली असता, संभंदित मयत व्यक्तीच्या डोक्याला मोठा जबर घाव असल्याचे निदर्शनास आले तसेच तेथील फाशीवर मात्र कुठेही रक्ताचे डाग दिसले नाहीत, तसेच ज्याठिकाणी सौ.दीक्षा चौकेकर यांनी गळफास लावून घेतला तेथील जमिनीपासून वरच्या भागात जेथे नायलॉनची दोरी बधली होती या अंतरामध्ये ही तफावत आढळत असल्याचे मयत व्यक्तीच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. म्हणजेच आत्महत्या करण्यासाठी संभंदीत व्यक्तीचा हात एव्हढ्या अंतरावर दोरी अडकवण्याकरिता कसा काय पोचवू शकतो ? जर आत्महत्या असेल तर डोक्याला जबर जखम कशी झाली असावी ? असे काहीसे अनुत्तरीत प्रश्न सदर मयत व्यक्तीच्या नातेव्हाहिकांच्या मनात निर्माण झाले आहेत.तसेच सौ. चौकेकर याच्या शविच्छेदना करिता कोल्हापूर येथील रुग्णालयातील वैद्यकीय प्राथमिक अहवालातही मयत व्यक्तीच्या डोक्याला खोल जखम झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबत योग्य तो तपास वेंगुर्ला पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी गरज पडल्यास श्वानपथक व्यवस्थापनाची मदत घेऊन सखोल तपास करावा व मयत सौ.दीक्षा चौकेकर याच्या कुटुंबीयांना योग्य न्याय द्यावा सदर प्रकरणी जर कोणी दोषी आढळल्यास त्यावर योग्यती शाकीय कार्यवाही करण्यात यावी व पीडित व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा.अशी मागणी मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी पत्रकारमाध्यमातून बोलताना केली आहे.
Home क्राईम मयत सौ.दीक्षा चौकेकर प्रकरणी वेंगुर्ले पोलिस ठाण्याच्या वतीने त्वरित योग्य त्या कार्यवाहीची...