Home स्टोरी मनोहर उर्फ भाई महादेव मांजरेकर यांचे निधन.

मनोहर उर्फ भाई महादेव मांजरेकर यांचे निधन.

213

मसुरे प्रतिनिधी: मालवण ओझर येथील (मूळ गाव मिठबाव भोजनेवाडी ) रहिवासी मनोहर उर्फ भाई महादेव मांजरेकर 69 वर्ष यांचे नुकतेच त्यांच्या ओझर येथील राहत्या घरी निधन झाले. भाई मांजरेकर या टोपण नावाने ते मालवण तालुक्यात प्रसिद्ध होते.

मनोहर मांजरेकर यांनी काही वर्ष मुंबई स्टेट बँक आणि नंतर काही वर्ष मालवण स्टेट बँकेमध्ये नोकरी करून सेवानिवृत्त झाले होते. मनोहर मांजरेकर यांनी मुंबई येथे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच स्वर्गीय खासदार मधुकर सरपोतदार, स्वर्गीय वामनराव महाडिक, दत्ताजी नलावडे, यांच्यासोबत काम केले होते. भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातूनही त्यांनी कामगारांचे नेतृत्व केले होते.

मुंबई सहित गावामध्ये राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, धार्मिक, शैक्षणिक,नाट्य क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे होते. अनेक होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठे सहकार्य केले होते. कथा, कादंबरी तसेच धार्मिक विभागाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या पश्चात एक भाऊ, दोन भावजया, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार असून सेवानिवृत्त शिक्षक काशिनाथ मांजरेकर यांचे ते भाऊ तसेच इंजि. गुरुप्रसाद मांजरेकर यांचे ते काका आणि रेवंडी येथील पोलिस पाटील शरविन कांबळी यांचे ते मामा होत.