सावंतवाडी प्रतिनिधी: भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा सावंतवाडी येथील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते मनोज नाईक हे गेली तीन दशके राजकारणात सक्रिय आहेत. शांत व पक्ष निष्ठा ठेवून काम करणारे असे व्यक्तिमत्व असल्यामुळे सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे अत्यंत जवळचे आणि मैत्रीचे संबंध आहेत. याचीच दखल घेत आज त्यांचा गौरव पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. मनोज अशी हक्काची हाकही मारली. रविवार ३ ऑगस्टला त्यांचा जन्मदिवस आहे. या निमित्ताने त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवराज लखम सावंत भोसले तसेच जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी आदी उपस्थित होते. श्री चव्हाण यांचे अत्यंत जवळचे आणि एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून नाईक यांची ओळख विशेष आहे. त्याचा प्रत्यय आज भाजपच्या जिल्हा विस्तार कार्यकारणी अधिवेशनात आला.