सावंतवाडी:- महाराष्ट्र नवनिर्माण विद्याथी सेना यांच्या वतीने सावंतवाडीतील सर्व शाळा महाविद्यालय यांच्या मुख्य प्रवेश द्वारावरील नावे इंग्रजी भाषेत आहेत ते फलक मराठी भाषेत करावे अशा मागणीचे निवेदन जवळपास १ ते दीड महिना पूर्वी सर्वच महाविद्यालय, शाळेना देण्यात आले, त्यानुसार काही शाळा कॉलेज ने आपले फलक मराठी भाषेत केले आले आहे.श्री पंचम खेमराज महाविद्यालय व मदर क्वीन शाळेचा फलक अद्याप पर्यंत मराठी भाषेत बसवला नसल्याने मनसे विद्यार्थी सेनेने याबाबत संबंधित महाविद्यालय व शाळेला भेट देत विचारणा केली आहे.
यावेळी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, ज्ञानेश्वर कांबळे, ऋषिकेश कर्माकर, भावेश सापळे, रोहित जाधव, चिन्मय जोली, पथ गोसावी, शुभम गोसावी, ओंकार जाधव आदी उपस्थित होते.
याबाबत संबंधित महाविद्यालय व शाळेकडून येत्या ७ दिवसात आपण प्रवेश द्वार वरील फलक मराठी भाषेत करु असं आश्वासन देण्यात आले आहे. ७ दिवसात फलक मराठीत झाले नाही तर सर्व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी महाविद्यालयच्या प्रवेशद्वार वरील इंग्रजी भाषेत असलेले फलक काढून टाकून मराठी भाषेत फलक बसवणार व यापुढे उद्धभवणाऱ्या परिणामास सर्वस्वी आपण जबाबदार असाल असा इशारा मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी दिला आहे.