Home स्टोरी मनसे लवकरच सासोली मधील भु माफिया पुढार्‍यांची पोलखोल ग्रामस्थाच्या मदतीने करणार मनसे...

मनसे लवकरच सासोली मधील भु माफिया पुढार्‍यांची पोलखोल ग्रामस्थाच्या मदतीने करणार मनसे स्टाईल ने..! उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ

40

सिंधुदुर्ग: उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख यांचे ओरिजीन कंपनी बरोबर साटेलोटे आहे. त्यामुळे उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख यांनी आंदोलनातुन माघार घेतली आहे. ओरिजीन कंपनी उबठा गटाचे जिल्हाप्रमुख यांना घेऊन काही ग्रामस्थांना दमदाटी करतात. हे मनसे कधीही खपवून घेणार नाही. उबाठा गटाचे दोन्ही बाजुचे नेते लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. तु मारल्या सारख कर मी रडल्यासारख करतो, पण अशा या भुलथापाना लोकं आता बळी पडणार नाहीत. सासोली ग्रामस्थाच्या बाजुने मनसे राहणार ठाम पणे उभी आहे. असं असं मनसे उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ यांनी सांगितलं.

मनसे उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ पुढे म्हणाले की, थोड्याच दिवसात मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे करणार सिंधुदुर्ग दौरा करणार आहेत. त्या दौऱ्यात मनसे प्रदेश सरचिटणीस संदिप दळवी आणि कामगार सेना प्रदेश सरचिटणीस गजानन राणे यांच्या मार्गदर्शनात सासोली ग्रामस्थ्यांची राजसाहेब ठाकरेंशी भेट घालुन देणार. त्या नंतर मनसे ग्रामस्थांना सोबत घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार आणि सासोलीतील पिडीत ग्रामस्थांना न्याय मिळवून देणार. या भु माफियांची आणि त्यांना मदत करणाऱ्या पुढार्‍यांची पोलखोल करून आणि ग्रामस्थानच्या मदतीने भु माफियांना हद्दपार करणार.