Home राजकारण मनसे देवगड पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा ६ जुलै रोजी होणार! संतोष मयेकर

मनसे देवगड पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा ६ जुलै रोजी होणार! संतोष मयेकर

184

४ जुलै वार्ता: महाराष्ट्र नावानिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने गुरुवार दिनांक ६ जुलै २०२३ सकाळी ११ वाजता श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, घाटे पेट्रोल पंप समोर कावले वाडी रोड देवगड मनसेच्या देवगड मधील सर्व आजी माजी पदाधिकारी, पक्षाच्या सर्व अंगीक्रुत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची तातडीची सभा आयोजित केली आहे. या सभेला मनसेचे राज्य सरचिटणीस व सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक मा. संदीप दळवी आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस मा. गजानन राणे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी मनसेच्या देवगड तालुक्यातील सर्व अंगीक्रुत संघटनेचे पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संतोष मयेकर यांनी केले आहे.