सावंतवाडी प्रतिनिधी: आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून राज्य सरकारनेत्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय २१ जानेवारी २०१३ रोजी घेण्यात आला. तेव्हापासून २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने तर्फे मनविसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष कु. केतन सावंत यांच्या संकल्पनेतून दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी राज्यभाषा गौरव दिनानिमित्त तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त मुलांनी आपला सहभाग दर्शवावा व मराठी ही जिव्हाळ्याची माय मराठी अशी ओळख असलेली राज्यभाषा आनंदाने अभ्यासात आणावी याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी सावंतवाडी तालुका युनिटअध्यक्ष कु.अमोल नाईक व माजी सिंधुदुर्ग युनिट अध्यक्ष कु.साईल तळकटकर यांनी सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांना भेट देली.
शाळा व महाविद्यालयांना या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभाग दर्शवावा व मुलांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. शाळा व महाविद्यालयांना निवेदन देऊन मराठी भाषेबद्दलचे आपले मत निबंधाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.