Home क्राईम मध्यप्रदेशच्या सतनामध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार!

मध्यप्रदेशच्या सतनामध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार!

194

२९ जुलै वार्ता: मध्यप्रदेशच्या सतनामध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिला अधिक चांगल्या उपचारांसाठी रीवा येथे रेफर करण्यात आलं आहे. या प्रकरणावरुन मध्य प्रदेशात राजकारण सुरु झालं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रकरणाची दखल घेतली आहे.पोलिसांनी चौकशीनंतर दोघांना अटक केली आहे. पीडित मुलगी अल्पवयीन आहे. मैहर पोलीस अनुविभागीय अधिकारी लोकेश डावर यांनी, आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं. तिच्या शरीरावर दाताने चावल्याचे निशाण आहेत. पीडितेच्या प्रायवेट पार्टवर लाठीने प्रहार करण्यात आलाय. मैहरचे SDOP लोकेश डावर यांनी ही माहिती दिली. गुरुवारी दोन आरोपी मुलीला लाडीगोडी लावून टेकडीवर घेऊन गेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला.

याबाबत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी टि्वट केलं आहे. ‘मला मैहर बलात्कार घटनेबद्दल माहिती मिळाली. मला खूप वेदना झाल्या. मी व्यथित आहे. मी पोलिसांना निर्देश दिले आहेत. कुठल्याही आरोपीला सोडणार नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रशासनाला मुलीच्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल’ असं त्यांनी टि्वटमध्ये म्हटलय.