Home क्राईम मध्यप्रदेशच्या उज्जैनमध्ये १२ वर्षांच्या मुलगीवर बलात्कार! माणुसकीला काळीमा फासणारी घटना.

मध्यप्रदेशच्या उज्जैनमध्ये १२ वर्षांच्या मुलगीवर बलात्कार! माणुसकीला काळीमा फासणारी घटना.

250

२७ सप्टेंबर वार्ता: मध्यप्रदेशच्या उज्जैनमध्ये १२ वर्षांच्या मुलगीवर बलात्कार झाल्यानंतर ती मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर मदत मागत फिरत होती. पिडीत मुलगी लोकांच्या घराचे दरवाजे ठोठावत ही मुलगी मदत मागत होती.परंतु मदत तर दूरच उलट लोकांनी घराचे दरवाजे बंद करुन घेतले. अशी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एक व्यक्ती मुलीची ही अवस्था आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत होता. मुलीने काही वेळाने त्या व्यक्तीकडेही मदत मागितली. पण त्या व्यक्तीने कोणतीही मदत केली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लोकांनी मदत नाकारल्यानंतर अखेर ती मुलगी एका आश्रमात पोहोचली. तेथील एका पुजाऱ्याला मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय आला. यानंतर त्याने तिला टॉवेल दिलं आणि जिल्हा रुग्णालयात नेलं. तिथं नेलं असता मुलीवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं.

मुलगी गंभीर जखमी असल्याने तिला इंदूरला नेण्यात आलं. मुलीला रक्ताची गरज असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. मुलगी गंभीर जखमी असल्याने तिला इंदूरला नेण्यात आलं. मुलीला रक्ताची गरज असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी दीपक शिंदे यांनी मुलीला तिचं नाव आणि पत्ता विचारलं असता ती योग्य माहिती देऊ शकली नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी दीपक शिंदे यांनी मुलीला तिचं नाव आणि पत्ता विचारलं असता ती योग्य माहिती देऊ शकली नाही. पोलिसांनी आरोपींविरोधात पॉक्सो अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.