Home स्टोरी मठ-कुडाळ-पणदूर-घोटगे हा रस्ता आ. वैभव नाईक यांनीच मंजूर केला; सा. बां. विभागाने...

मठ-कुडाळ-पणदूर-घोटगे हा रस्ता आ. वैभव नाईक यांनीच मंजूर केला; सा. बां. विभागाने दिला दुजोरा…!

167

सिंधुदुर्ग प्रतिनिधी:  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मठ-कुडाळ-पणदूर-घोटगे रा. मा. १७९ हा रस्ता आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केलेला असून या रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच त्यांनी केले आहे. मात्र भाजपच्या श्रेयवादासाठी उद्या ६ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा एकदा या रस्त्याचे शासकीय भूमिपूजन केले जाणार आहे. त्या शासकीय कार्यक्रमास आ.वैभव नाईक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता यांनी रस्ता भूमिपूजनाच्या कार्यक्रम पत्रिके बरोबर दिलेल्या संक्षिप्त टिपणीत मठ- कुडाळ- पणदूर- घोटगे रा. मा. १७९ या रस्त्याची प्रशासकीय मंजुरी १६/०२ /२०२२ रोजी (अर्थात महाविकास आघाडी सरकारच्या काळात )झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.त्यासंबंधीचा शासन निर्णय देखील जोडण्यात आला आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांनीच हा रस्ता मंजूर केला हे सिद्ध होत असून संक्षिप्त टिपणी द्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याला दुजोरा दिला आहे.

 

रस्ता भूमिपूजन कार्यक्रम पत्रिका,सा.बा. विभागाची संक्षिप्त टिपणी आणि शासन निर्णय खाली देत आहोत.